Getting pregnant after 40 :Risk of the baby being born prematurely is higher: Doctors opinion -Lokmat

नवी मुंबई: गेल्या काही वर्षांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचे प्रमाण वाढत असून यामागे गर्भधारणेचे वाढते वय हे देखील एक कारण असल्याचे मत डॉक्टरांनी नोंदविले आहे. चाळीशी किंवा त्यानंतर गर्भधारणा झालेल्या मातांमध्ये मुदतपूर्व बालके जन्माला येण्याचा धोका जास्त असतो. मुदतपूर्व म्हणजे प्रसूतीच्या ठराविक कालावधी (३७ आठवडे) आधीच बाळ जन्माला येणे. या बाळांची पुरेशी वाढ न झाल्याचे यांचे वजन कमी असतेय त्यामुळे या बाळांची सुरुवातीचे काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे असते.